बारामती नगरपरिषदेत सेवा हक्क दिन साजरा

बारामती नगरपरिषदेत सेवा हक्क दिन साजरा

 

सेवा हक्क दिनानिमित्त बारामती नगरपरिषदेत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

बारामती:- बारामती नगर परिषदे मध्ये विविध उपक्रमांनी  सोमवार दि.२८ रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला.या अधिनियमाच दशकपूर्तीनिमित्त जनसहभागातून विविध उपक्रम राबवण्यात आले.तसेच राज्य शासनाच्या सरकार सेवा पोर्टल द्वारे दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन सेवांबाबत जनजागृती करण्यात आली. मुख्याधिकारी पंकज भुसे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

सोमवारी या निमित्त नगरपरिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमातील तरतुदी व त्याचा वापर,कायद्याची उद्दिष्ठ्ये,वैशिष्ठ्यै याचे प्रशिक्षण देण्यात आले.     

पुणे येथील ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अब्राहम आढाव यांनी प्रशिक्षण दिले.भारताच्या संविधान उद्देशि केचे वाचन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारीवर्ग, नागरिक,'सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यालय अधिक्षक अश्विनी अडसूळ यांनी प्रास्ताविक केले. मुख्य लेखापाल तुषार मोरे यांनी स्वागत केले.