
ॲड.प्रसाद खारतोडे वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ४५ मतांनी विजयी
बारामती:- प्रसिद्ध कायदेविशारद श्री. प्रसाद खरतोडे यांनी बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ४५ मतांनी जिंकून यशस्वीपणे बाजी मारली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली असून, श्री. खरतोडे यांच्या नेतृत्वगुणांना व त्यांच्या कार्यक्षमतेला वकिल बांधवांनी भरभरून पाठिंबा दर्शविला.
या निवडणुकीत अॅड. प्रसाद खारतुडे यांनी ५०७ मते मिळवत ४५ मतांनी विजय संपादन केला. त्यांच्या प्रतिस्पर्धी अॅड. नितीन भामे यांनी ४६२ मते मिळवून जोरदार लढत दिली.
संघटनेत अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या अॅड. खारतुडे यांचा मोठा विजय झाला असून, त्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांचे आणि मतदारांचे आभार मानले.
दुसरीकडे, अॅड. नितीन भामे यांचा देखील संघटनेतील प्रभाव लक्षात आला. त्यां च्या कार्यपद्धतीला आणि विचारसरणीला मिळालेला पाठिंबा लक्षणीय होता. त्यांनी पराभव स्वीकारत अॅड. खारतुडे यांचे अभिनंदन केले आणि संघटनेच्या हितासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.