अनेकान्तच्या प्राचार्या पदी सौ. प्रणाली वडेर यांची नियुक्ती

अनेकान्तच्या प्राचार्या पदी सौ. प्रणाली वडेर यांची नियुक्ती

 

बारामती:- दि. ०५/०५/२०२५ रोजी अनेकान्त इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सौ. प्रणाली वडेर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला, त्यावेळी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री. विकास शहा(लेंगरेकर), स्कूलचे व्यवस्थापक श्री. धवल शहा(वाघोलीकर), स्कूल कमिटीचे सदस्य श्री. समीर शहा(वाघोलीकर) उपस्थित होते.

याप्रसंगी त्या बोलताना म्हटल्या कि, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करत राहू.संस्थेचे अध्यक्ष श्री. जवाहर शहा(वाघोलीकर), सचिव श्री. मिलिंद शहा (वाघोलीकर), स्कूलचे चेअरमन श्री. चंद्रवदन शहा (मुंबईकर) यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.