
लाडक्या बहिणींना १५०० नाही तर आता मिळणार तब्बल ४०,००० रुपये, महायुती सरकारचा महा-प्लॅन
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार इथं लाडक्या बहिणी बसल्यात मला त्यांना सांगायचं आहे, कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात. लाडक्या बहिणींना दरमहिन्याला 1500 रुपये देतो. ज्या लाभार्थी महिला त्यात बसतात त्यांना योजना बंद करणार नाही. या योजनेतून लाडक्या बहिणींना मदत होते. आम्ही एक प्रस्ताव समोर आणलेला आहे, काही बँका पुढं आणलेल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी बोलणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या आहेत. आमचे दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात, त्या ऐवजी भगिनीला त्यांनी 30 ते 40 हजार रुपये द्यायचे, हप्ता लाडकी बहीण मधून हप्ता जाईल. 40 हजार रुपयांचं भांडवल मिळालं तर बहीण काही तरी व्यवसाय करु शकले. त्याच्यातून तिचं कुटुंब ती उभं करु शकेल. हे होऊ शकतं, महाराष्ट्रात काही बहिणींनी हे केलं आहे. तुम्ही पण त्या गोष्टीचा विचार करा, असं अजित पवार म्हणाले. मी माझ्या कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना सांगणार आहे ती योजना कशी आहे. आम्ही हा कार्यक्रम देणार आहे, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे, अशी विनंती असल्याचं अजित पवार म्हणाले.
भारताने पाकिस्तान विरुद्ध कणखर भूमिका घेतली पर्यटकांवर जो हल्ला झाला, त्यामुळे संपूर्ण भारतीय नागरिक देशात पेटून उठले. आपल्याला बदला घ्यायचा होता त्यावर सरकारने दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवलं. पाक मधील दहशतवादी तळावर हल्ले करून ते नष्ट केले त्याबद्दल राज्यातील सर्व जनतेच्या वतीने स्वतः अजित पवार यांच्या वतीने देशातील सैनिकांचे व सरकारचे आभार मानले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आता सहन केला जाणार नाही हे भारताने ऑपरेशन सिंदूर करून पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. आपण देशाच्या पलीकडे कारवाई करण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवून दिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कणखर भूमिका घेत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.