
छत्रपती साखर कारखाना निवडणुकीत श्री जय भवानीमाता पॅनेल वाढत्या पाठिंब्याने मजबूत; छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवारांचा श्री जय भवानीमाता पॅनेलला पाठींबा
सोमवार, १२ मे, २०२५
Edit









बारामती:- भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत छत्रपती बचाव पॅनलच्या आजपर्यंत सहा उमेदवारांनी श्री भवानीमाता पॅनेलला जाहीर पाठींबा दिला आहे.तर भवानीमाता पॅनल ला पाठींबा वाढत आहे.दररोज नवनव्या घडामोडी रोजच घडत असून,सभासदांचाही वाढता प्रतिसाद व पाठींब्यामुळे भवानीमाता पॅनल दिवसागणिक अधिकाधिक मजबूत होतांना दिसत आहे.
छत्रपती बचाव पॅनेलतर्फे घोषित केलेल्या कांही उमेदवारांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कृती समितीच्या जय भवानी माता पॅनलला पाठिंबा दिला होता आतां निवडणूक मध्यावर असतानाच भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले इंदापूर तालुक्याचे माजी सभापती तुकाराम गणपत काळे यांनी अचानक माघार घेत जय भवानीमाता पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे.
तुकाराम काळे यांच्या माघारीचा जय भवानीमाता पॅनल मधील या प्रवर्गातील उमेदवार डॉ. योगेश बाबासाहेब पाटील यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांची निवड आतां निश्चित मानली जात आहे. छत्रपती बचाव पॅनल कडे १६ उमेदवार होते. आता त्यांची घटून संख्या पंधरावर आली आहे.
यापूर्वी अभयसिंह विठ्ठलराव निंबाळकर यांनी माघारीचा निर्णय घेत आपला छत्रपती बचाव पॅनलशी संबंध नाही असे स्पष्ट केले होते आणि त्यांनी जय भवानी माता पॅनलला पाठिंबा दिला होता.मात्र या दरम्यान छत्रपती बचाव पॅनेलने सणसर गटातून अपक्ष असलेल्या शिरसाट यांना उमेदवारी देत ही जागा भरून काढली होती.आता मात्र तुकाराम काळे यांच्या माघारीने हा प्रवर्ग पूर्णपणे रिकामा मोकळा झाला आहे.








तुकाराम काळे हे इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती आहेत.त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे जय भवानीमाता पॅनलची स्थिती आणखीनचं भक्कम झाली आहे असा दावा पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचक-बापू व समन्वयक किरणदादा गुजर यांनी केला.