
बारामती तालुका शिक्षक क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी चौधरी
बारामती:- बारामती तालुका शिक्षक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी जनार्दन तुकाराम चौधरी,उपाध्यक्षपदी संजय विठ्ठल बारवकर यांची,तर वसतिगृह अध्यक्षपदी जीवन परशुराम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
१०७ कोटी उलाढाल,आठ टक्के कर्जव्याजदर ४० लाखाचे विमाकवच अशी वैशिष्ट्ये असणाऱ्या बारामती शिक्षक सोसायटीच्या पदाधिकारी निवडी शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब
मारणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध पार पडल्या. लोकल ऑडिटरपदी वृषाली जगताप आणि हनुमंत कोकरे यांची निवड केली,तर सचिवपदी संतोषकुमार राऊत,हिशेबनिसपदी अण्णा नामदास, उपसचिवपदी शफीक इनामदार व जालिंदर बालगुडे यांच्या फेरनिवडी केल्या. ज्येष्ठ नेते ह. मा. जगताप, तानाजी भोसले, नारायण निकम, देविदास ढोले यांनी मार्गदर्शन केले. शहाजी भोसले यांनी आभार मानले.
याप्रसंगी गेनबा आगवणे, गजानन गाढवे, विशाल खरात, रा.ना.जराड,दत्तात्रेय वीरकर, संजय आटोळे,काका काळभोर, सावता नाळे, भाऊ आटोळे, सुभाष वणवे, नवनाथ कुदळे, सुखदेव वाघमारे, माऊली भापकर, अशोक सोनवणे, शरद खेत्रे, सचिन बारवकर, वैशाली जाधव आदी उपस्थित होते.