कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना कशी करता येईल यासाठी बारामतीत परिसंवाद

कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना कशी करता येईल यासाठी बारामतीत परिसंवाद

 

बारामती:- घनकचरा व्यवस्थापनाचे आव्हान व उपाययोजना या विषयावर एमआयडीसी मध्ये मंगळवारी २७ मे रोजी परिसंवादाचे आयोजन – बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचा उपक्रम

बारामती MIDC औद्योगिक क्षेत्र व लगतच्या ग्रामपंचयतींमध्ये औद्योगिकरण व नागरीकरणामुळे औद्योगिक व घरगुती कचऱ्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या कचऱ्याचे व्यवस्थापन व शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे नियोजन आत्तापासूनच करणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या अत्यंत उग्र स्वरूप धारण करू शकते.

यामुळे बारामती औद्योगिक क्षेत्रात व लगतच्या गावांमध्ये आरोग्य ,स्वच्छता व पर्यावरण विषयक समस्या वाढत जाणार हे उघड आहे. या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना कशी करता येईल याची सर्वांगीण पातळीवर चर्चा करण्यासाठी पर्यावरण व प्रदूषण क्षेत्रातील तज्ञ, वरिष्ठ शासकीय अधिकारी व एमआयडीसीतील उद्योजकांना निमंत्रित करून बारामती एमआयडीसी मध्ये घनकचरा व्यवस्थापन विषयावर एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असलेची माहिती बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.

बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर , एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील , महाराष्ट्र प्रदूषण निमंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी कार्तिक लंगोटे , कार्यकारी अभियंता विजय पेटकर, गटविकास अधिकारी डॉ अनिल बागल , बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे आदी वरिष्ठ शासकीय अधिकारी या चर्चासत्रत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सदर परिसंवाद बारामती एमआयडीसी मधील हॉटेल रॉयल इन येथे मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार असून बारामती MIDC मधील सर्व लहान मोठ्या उद्योगांनी अवश्य सहभागी व्हावे असे आवाहन बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी केले आहे.