
छत्रपती कारखाना निवडणूक; श्री जय भवानीमाता पॅनलचे उमेदवार जाहीर
बारामती : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी श्री जय भवानी माता पॅनलचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे तसेच अजित पवार यांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आला असून निवडणूक बिनविरोध करण्याचा मानस असल्याचे किरण गुजर यांनी स्पष्ट केले. उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. महाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न असून काहींना स्वीकृत पदी संधी मिळू शकते असे त्यांनी यावेळी जाहीर केले.
गटनिहाय उमेदवार खालील प्रमाणे
गट नंबर १) लासुरने
- पृथ्वीराज साहेबराव जाचक
- शरद शिवाजी जामदार
गट नंबर २) सणसर
- रामचंद्र विनायक निंबाळकर
- शिवाजी रामराव निंबाळकर
गट नंबर ३) उद्धट
- पृथ्वीराज श्रीनिवास घोलप
- गणपत सोपान कदम
गट नंबर ४) अंथुरणे
- विठ्ठल पांडुरंग शिंगाडे
- प्रशांत दासा दराडे
- अजित हरिश्चंद्र नरुटे
गट नंबर ५) सोनगाव
- अनिल सिताराम काटे
- बाळासाहेब बापूराव कोळेकर
- संतोष शिवाजी मासाळ
गट नंबर ६) गुणवडी
- कैलास रामचंद्र गावडे
- सतीश बापूराव देवकाते
- निलेश दत्तात्रय टिळेकर
ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था पणन
अशोक संभाजीराव पाटील
अनुसूचित जाती जमाती
मंथन बबनराव कांबळे
महिला राखीव प्रतिनिधी
माधुरी सागर राजपुरे, सुचिता सचिन सपकाळ
इतर मागास प्रवर्ग
तानाजी ज्ञानदेव शिंदे
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास
डॉक्टर योगेश बाबासाहेब पाटील