सोळा लाखांच्या बिलासाठी साठ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक अडकला एसीबीच्या जाळ्यात

सोळा लाखांच्या बिलासाठी साठ हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक अडकला एसीबीच्या जाळ्यात

 

बारामती : बारामती तालुक्यातील पळशी येथील ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असुन त्यांनी बारामती तालुक्यातील पळशी गावाच्या हद्दीतील एका सिमेंट बंधाऱ्याचे काम केले होते या कामा पोटी त्यांना 16 लाख 46 हजार रुपये मिळणार होते या बिलाच्या मंजुरीसाठी तालुक्यातील पळशी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कांतीलाल बापुराव काळाणे, ( वय 57 वर्षे ) यांनी तक्रारदाराला एकुण बिलाच्या चार टक्क्यानुसार 60 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती दरम्यानच्या काळात काळाने यांनी कामाच्या बिलातील 14 लाख 96 हजार रुपयाचा पहिला धनादेश देताना तीस हजार रुपये तक्रारदाराकडून रोख स्वरूपात लाच घेतली होती, त्यानंतर उर्वरित एक लाख 50 हजार रुपयाचा धनदेश काढण्यासाठी ग्रामसेवक काळाने हे उर्वरित तीस हजार रुपये मागणी करीत होते, ठेकेदार असलेल्या तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाद मागितली त्यानुसार बुधवारी दि.७ मे रोजी सापळा रुचून काळाने यांना एका रस्त्याच्या बाजूला पंचवीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले.