
बारामतीत व्यापारी वर्ग हतबल,असुरक्षित; भरदिवासा चोऱ्यांचे प्रमाण वाढले
बारामती:- बारामतीत अनेक ठिकाणी चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या होत असलेल्या चोऱ्यांच्या प्रकारामुळे किरकोळ व्यवसाइकांचे सोबत व्यापारी वर्गातही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
बारामती शहरातील महावीर पथ या वर्दळीच्या ठिकाणी भर दिवसा एका कापड विक्रेत्याचे कापडाचे आलेले पार्सल एका चोराने चोरी केल्याचे समोर आले आहे.आणि झालेला हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीआहे.
तर दुसरीकडे याच बारामतीत काही अल्पवयीन हत्यारबंद मुले जी इथल्या सुधारगृहात आहेत ती देखील वारंवार चोरी करीत आहेत, त्यामुळे देखील व्यापारी वर्ग आणि नागरिक हैराण झाले आहेत. या अल्पवाईन मुलांची फिर्याद प्रशासन घेण्यास हतबल आहे तर ही मुले काही व्यापाऱ्यांनी पाठलाग करून पकडली तरी अखेरीस त्यांच्याशीच तडजोडी कराव्या लागत असल्याने व्यापारीवर्ग पुरा हतबल आणि प्रशासनावर नाराज आहे.