
छत्रपती कारखान्याचे १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ठ ; पृथ्वीराज जाचक यांची माहिती : ऊस लागवड धोरण जाहीर
बारामती :- भवानीनगरच्या श्री. छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षीच्या गळीत हंगामामध्ये संचालक मंडळाने १२ लाख टन उस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याला अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सभासदांनी सर्व ऊस गाळपास श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला घालावा,असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज बापू जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी केले आहे.
भवानीनगरच्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ चे ऊस लागवड धोरण निश्चित केले आहे.शेतक ऱ्यांना १ जुलै २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत ऊस लागवड करता येणार आहे,अशी माहिती पृथ्वीराज बापू जाचक यांनी दिली.
कारखान्याने २०२६-२७ च्या गाळप हंगामासाठी ऊस लागवड धोरण निश्चित केले आहे.१ जुलै ते १५ जुलैपर्यंत को-एम.०२६५ या जातीच्या उसाची लागवड करता येणार आहे.१६ जुलै ते ३१ऑगस्टपर्यंत को-८६०३२ पी.डी.एन.१५०१२ या जातीचा ऊस लावता येईल.१ सप्टेंबर ते ३०नोव्हेंबर पूर्व हंगामा मध्ये व एक डिसेंबर २०२५ ते३१ मार्च २०२६पर्यंतचे सुरू हंगामाम ध्ये को-८६०३२,एम.एस१०००१ पी.डी.एन.१५०१२,फुले १५००६,फुले १३००७ या जातीचा ऊस लावता येणारआहे. २०२५ - २६ गळीत हंगाम सुरू झाल्यापासून हंगाम संपेपर्यंत को-८६०३२,एम.एस.१०००१, पी.डी.एन.१५०१२ व को-एम. ०२६५ या जातीचा खोडवे व निडवे ठेवण्याची परवानगी दिलेली आहे.
♦पट्टा पद्धतीने लागवड करण्याचे आवाहन
दिवसेंदिवस ऊस तोडणी मजुरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.त्यावर मात करण्यासाठी मशिनने ऊस तोडणी करणे गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवड करतांना ४ व ५ फूट रुंद सरी काढून पट्टा पद्धतीने लागवड करावी.यामुळे एकरी उत्पादनामध्ये वाढ होणार असून कीड व रोग नियंत्रण करणे ही सोपे जाणार आहे.