
सर्वांनी प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जागरूक राहाण्याची - नागेंद्र भट
भिगवण (प्रतिनिधी) :- सध्याच्या काळात प्लास्टिक प्रदूषणाचा खूपच गंभीर प्रश्न आपल्या सर्वांसमोर आ वासून उभा असतांना प्रत्येकाने स्वतः प्लास्टिक प्रदूषणालाआळा घालण्यासाठी काय करू शकतो? याचा गांभीर्याने विचार करून पावले उचलण्याची गरज असल्याचे मत बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीचे युनिट हेड नागेंद्र भट यांनी व्यक्त केले.कंपनी प्लास्टिकला पर्यायी अशा उत्पादनावर संशोधन करीत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना नमूद केले.
भिगवण येथील बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीच्या वतीने ५३ व्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुरुवार दि.५जून रोजी मराठी,हिंदी,इंग्रजी स्लोगन स्पर्धा तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी आयोजित केले होते.
या बक्षीस वितरण सोहळ्यास बिल्ट ग्राफिकचे धरेंद्र गांधी ( इंजिनियरिंग विभाग प्रमुख), अण्णासाहेब जाधव (पॉवर प्लँट विभाग प्रमुख),अजित दुबे (इलेक्ट्रीकल विभाग प्रमुख), सुजित म्हेत्रे (यांत्रिकी विभाग प्रमुख),श्री.पाथरकर (गुणक्ता नियंत्रण विभाग प्रमुख), जशविंदर सिंह मुंजाळ (अकौंट विभाग प्रमुख) या प्रमुखांसह दोनशेहून आधिक कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.
कंपनी वीज वापर कमी करण्याविषयी सतत कार्यरत असून वीज वापर २४ मेगावॅट पर्यंत कमी झाल्याचाही उल्लेख श्री.भट यांनी आपल्या भाषणात केला.
या प्रसंगी श्री.गांधी व श्री. जाधव यांनीही प्लास्टिक प्रदुषणाला आळा घालून पर्यावरणाचा समतोल राखण्या बद्दल आपले विचार व्यक्त केले. पर्यावरण विभाग प्रमुख श्री.बी. बी.पाटील यांनी पर्यावरण अहवाल सादर करताना त्यांच्या विभागाने पर्यावरण. संरक्षणासाठी कोणकोणती कामे केली याचा गोषवारा सादर केला. तसेच पर्यावरण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कंपनी कमीत कमी पाण्याचा वापर करून कागद उत्पादनाचे नव नवीन उच्चांक करण्यात यशस्वी होत असल्याचे सांगितले.गेल्या वर्षभरात दोनशेपेक्षां अधिक झाडांची लागवड कंपनीच्या आवारात केल्याचेही त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी पर्यावरण विभाग प्रमुख बी.बी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रास्तविक श्री भिडे यांनी केले तर श्री गाढवे यांनी आभार मानले.