
करदात्यांनी शास्ती,व्याजाची रक्कम वगळून कर भरावेत - पंकज भुसे; बारामती नगरपरिषदेच्या अभय योजनेचा लाभ घ्यावा
बारामती:- राज्य शासनाने नगर परिषद,नगरपंचायत तसेच औद्योगिक नागरी क्षेत्रातील माल मत्ता करांसाठी अभय योजना सुरू केली असतांना बारामती नगरपरिषदेने सन २०२५-२६ च्या मालमत्ता कराच्या प्रोव्हिज नल बिलांमध्ये शास्ती,व्याजाची रक्कम लावली होती.अखेर बारामती नगरपरिषदेने अभय योजनेची अंमलबजावणी आता सुरू केली असून शास्ती,व्याजा ची रक्कम वगळून थकीतकराचा भरणा करावा,असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.
बारामती नगरपरिषदेने या संबंधी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे.मालमत्ता करावरील 'शास्ती अंशतःअथवा पूर्णतः माफ करून कर वसुलीला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने अभय योजना राबविण्या बाबत राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने बारामती नगर परिषदेने करदात्यांना शास्ती, व्याजाची रक्कम वगळून आता थकीत रकमेचा भरणा करावा, असे आवाहन केले आहे.