
मी स्वच्छ आहे कोणाला मिंदा नाही माझं काम बोलत; माळेगावच्या प्रचारात अजित पवारांचे प्रतिपादन
बारामती:- मी कधीही जातीपातीचं नात्यागोत्याचं राजकारण केलं नाही, शासकीय बदल्यान बाबतीत कोणाचा एक रुपया घेतला नाही, माझ्याकडे आलेल्या प्रत्येक निवेदनावर मी तातडीने निर्णय घेतो. मी कामाचा माणूस आहे मी स्वच्छ आहे. मी कोणालाही निंदा नाही माझं काम बोलतं असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष ऍड केशवराज जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
माळेगाव साखर कारखान्याच्या जवळपास 22 हजार 500 सभासदांच्या कुटुंबांचा हा प्रश्न आहे, म्हणजे एकूण सव्वा लाख लोकांची निगडित माळेगाव कारखाना असल्याने, मी स्वतः उमेदवारी जाहीर करून चेअरमन या पदावर दावेदारी केली आहे, जेणेकरून मला अत्यंत काटकसरीने पारदर्शकपणे आणि बारकाईने कामकाज करता येऊन, कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना जास्तीचा ऊस दर देता येईल असे अजित पवार यांनी सांगितले.
पाच वर्षे तुम्ही मिटींगला आला नाही
माळेगाव साखर कारखान्याच्या सभासदांनी तुम्हाला बहुमताने निवडून दिले होते, असे असताना तुम्ही पाच वर्षे कारखान्याच्या मिटींगला उपस्थित राहिला नाहीत तुम्हाला ज्या सभासदांनी निवडून दिले त्यांच्या मतांचा तुम्ही अपमान केला. त्यामुळे तुम्हाला मत का द्यायचे असा सवाल करीत कारखान्याचे अध्यक्ष ऍड. केशवराव जगताप यांनी चंद्रराव तावरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.