
बारामतीत मुलाखत ए-आय तंत्र कार्यशाळा
बारामती :- येथील तुळजारा म चतुरचंद महाविद्यालय आणि मॅजिक बस फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मुलाखत तंत्र आणि कौशल्यसंदर्भात १० दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्र, आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सचा वापर, प्रॉम्प्ट इंजीनियरिंग आणि चॅट जीपीटीचा वापर याविषयी ट्रेनिंग देण्यात येत आहे.या कार्यशाळे करिता मॅजीक बस
फाउंडेशनचे मास्टर ट्रेनर शुशील धावांडकर, निखिल पवार, प्रमोद भालेराव,संस्कृती उपरे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
ही 'कार्यशाळा १३ जूनपर्यंत महाविद्यालयातील व्होकेशनल हॉल येथे 'सुरू आहे. ही कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर फाउंडेशनकडून मेगा 'ड्राईव्ह घेतला जाणार आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी 'उपलब्ध होणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळे मध्ये सहभागी होऊन हीकौशल्य आत्मसात करावीत, असे आवाहन प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी केले.
कार्यशाळेच्या आयोजना करिताउपप्राचार्य,रजिस्ट्रार,प्लेसमेंट ऑफिसर प्रा.महेश फुले यांनी परिश्रम घेतले.