दवाखान्यातून अल्पवयीन मुलगी डोर्लेवाडीतून बेपत्ता

दवाखान्यातून अल्पवयीन मुलगी डोर्लेवाडीतून बेपत्ता

 

बारामती :- डोर्लेवाडीतील दवाखान्यात मावशी सोबत थांबलेली अल्पवयीन तरूण  मुलगी डोर्लेवाडी येथून बेपत्ता झाली.या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

        पोलिसांनी अज्ञाताचे विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकणी संबंधित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.मळद येथे राहणाऱ्या या मुलीची मावशी डोर्लेवाडी येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झाली होती.

      उपचार घेणाऱ्यां मावशी सोबत थांबण्यास कुटुंबातील कोणी नसल्याने या मुलीला तेथे थांबविण्यात आले होते.गुरुवारी (दि.५ जून) दुपारी मावशीला औषधे दिल्यानंतर तिला झोप लागली. त्यानंतर ही मुलगी तेथून बेपत्ता झाली.अज्ञाताने तिला फूस लावून पळवून नेले असावे, अशी शक्यता फिर्यादीत व्यक्त करण्यात आली असून पोलिस शोध घेत आहेत.