डॉ.महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने नक्षत्र गार्डनमध्ये ‘नेचर वॉक’चे आयोजन

डॉ.महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने नक्षत्र गार्डनमध्ये ‘नेचर वॉक’चे आयोजन

 

बारामती:- पर्यावरण संवर्धनाची जाणीव वाढविण्यासाठी निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत आहे. संसदेच्या सदस्य आणि ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या प्रमुख मार्गदर्शिका सौ. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या प्रेरणेतून अशाच एका उपक्रमा अंतर्गत, नक्षत्र गार्डनमध्ये ‘एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया’च्या वतीने ‘नेचर वॉक’चे आयोजन करण्यात आले. या नेचर वॉकचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध पर्यावरणप्रेमी आणि जैवविविधतेचे अभ्यासक डॉ.महेश गायकवाड यांनी केले.

या उपक्रमात निसर्गप्रेमी आणि फोरम चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्गात फेरफटका मारताना गायकवाड यांनी देशी झाडांचे महत्त्व विशद करत, “देशी झाडे लावा, तीच आपला निसर्ग वाचवतील,” असे आवाहन उपस्थितांना केले. देशी वनस्पतींमुळे स्थानिक पर्यावरण टिकून राहते, तसेच त्या विविध पक्ष्यांना, कीटकांना आणि प्राणीजीवनाला आधार देतात, याचे त्यांनी प्रात्यक्षिकासह स्पष्टीकरण दिले. तसेच, त्यांनी वेगवेगळ्या पक्ष्यांविषयी माहिती देताना त्यांच्या अधिवास, आहार, आवाज व जैवसाखळीतील भूमिकेवर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. उपस्थितांनीही त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला.