आज श्रीसिद्धेश्वर मंदिरात शिवरात्र कीर्तन महोत्सव व महाप्रसादाचे आयोजन
बारामती:- येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दरमहा येणाऱ्या शिवरात्रीचे कीर्तन व महाप्रसादाचे सोमवार दि२३ जुन रोजी करण्यात आलेले आहे.
ज्याप्रमाणे वर्षातुन एकदा महाशिवरात्री असते त्यावेळी जगभरातील शिवमंदिरात महाउत्सवाचे आयोजन करण्यात येते.
तर दर महिन्याला तिथीनुसार प्रत्येक महिन्याला येणाऱ्या शिवरात्रीला शिवभक्त मनोभावे श्रीशंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतात.कांही जण उपवास करत असतात व आपल्या मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना करतात.
ह्या जुन महिन्यात सोमवार दि.२३ रोजी १७ वी मासिक सेवा केली जाणार आहे.शिवरात्रीच्या दिवशी येथील श्रीसिद्धेश्वर मंदिर, सिद्धेश्वर गल्ली येथे शिवरात्र किर्तन महोत्सव समितीच्या वतीने संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत हरिपाठाळचे आयोजन केले आहे.भक्तिनाद भजनी मंडळ,कल्याणी नगर,बारामतीत ह्यांचे वतीने सेवा केली जाणार आहे.संध्याकाळी ७ ते ९ वाजे पर्यंत सातारा येथील प्रसिद्ध कीर्तनकार गुरुवर्य ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव हे कीर्तन सेवा करणार आहेत.किर्तनसेवे नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या महिन्यातील सेवा सलग १७ महिन्यांपासून अखंडित, अविरत मोठ्या उत्साहात समितीच्या वतीने चालू आहे.
शिवभक्तांनी शिवरात्र कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याची विनंती श्रीसिद्धेश्वर कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे.