शिर्सुफळ येथे अवैद्य गुटखा वाहतुकीवर कारवाई..

शिर्सुफळ येथे अवैद्य गुटखा वाहतुकीवर कारवाई..

 

बारामती:- मा. संदीप गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे सुचनेनुसार मा. गणेश बिरादार  अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण व मा. सुदर्शन राठोड पोलीस उपविभागीय अधिकारी बारामती विभाग पुणे ग्रामीण यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत होणारे अवैद्य धंदयावर कारवाई  करण्याकरीता कळविलेने दिनाक २४/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक वैशाली पाटील बारामती तालुका पोलीस स्टेशन यांना पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य गुटखा वाहतुक होत असलेची गोपनिय माहीती मिळालेने पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांचे सोबत ग्रे. पोलीस  उपनिरीक्षक शिंगाडे व चालक पो.शि तरंगे असे मिळाले बातमीचे ठिकाणी गेले असता एक ग्रे रंगाची मारूती सुझुकी कंपनीची इको गाडी नंबर एम.एच ४२ बी.बी ७२४० ही मौजे शिर्सुफळ ता. बारामती जि. पुणे गावचे हद्दीत समाज मंदीराचे शेजारी रोडचे कडेला उभी असलेचे दिसल्याने सदर गाडीजवळ जावुन त्यावरील चालकांस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव पत्ता सागर मनोहर साबळे वय ३२ वर्षे रा. कटफळ ता. बारामती जि. पुणे असे सांगितले असता त्याचे गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये मानवी जिवीतास धोका असणारा व महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला पानमसाला, गुटखा, तंबाखु मिळुन आल्याने आरोपी याचे ताब्यात असलेली इको गाडी व पानमसाला, गुटखा, तंबाखु असा एकुण २,३०,२५०/- रू किंमतीचा मुद्देमाल बारामती तालुका पोलीस स्टेशन यांनी जप्त केला असुन सदर आरोपी हा पानमसाला, गुटखा, तंबाखु याची अवैद्य विक्री करीत असलेचे निष्पण झाल्याने सदर आरोपी याचे विरोधात मा. गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण व मा. सुदर्शन राठोड पोलीस उपविभागीय अधिकारी बारामती विभाग पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई विठ्ठल छगन तरंगे यांचे दिले फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. ३०२ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ व अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ कलम २६(२),(आय. व्ही), २७, ३० (२), (१) तसेच नशा व नियमन अधिनियम कायदा कलम ३१(१),(२),५९(१) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तरी सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे ब.नं. ३३३१ बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत.