दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग
मंगळवार, २२ जुलै, २०२५
Edit
एअर इंडियाच्या विमानात आग लागल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानात ही आग
लागली. हे विमान हाँगकाँगहून दिल्लीच्या दिशेने येत होते. विमानतळावर
उतरताच विमानाच्या ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) ला आग लागली. सुदैवाने सर्व
प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.
याबाबत अधिक माहिती एअर इंडियाने दिली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, मंगळवारी हाँगकाँगहून दिल्लीला येणारी फ्लाइट क्रमांक एआय ३१५ लँड झाल्यानंतर प्रवासी खाली उतरत होते. यावेळी अचानक ऑक्झिलरी पॉवर युनिट (एपीयू) मध्ये आग लागली. या आगीमुळे विमानाचे थोडेफार नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. आता या आगीच्या कारणांचा शोध घेतला जाईल.
APU म्हणजे काय ते जाणून घ्या?
APU
म्हणजेच ऑक्झिलरी पॉवर युनिट हे एक लहान गॅस टर्बाइन इंजिन असते. हे
विमानाच्या शेपटीत बसवलेले असते. ऑक्झिलरी पॉवर युनिट विमान उभे असताना वीज
पुरवठा आणि एअर कंडिशनिंग सारखी कामे करते. हे उड्डाणादरम्यान मुख्य
इंजिनचे काम करत नाही, परंतु विमानाच्या पार्किंग दरम्यान आवश्यक असते.