
पणदरे येथील ऐश्वर्या कीर्तने यांचे विद्युत पारेषण परीक्षेत सूयश
बुधवार, १६ जुलै, २०२५
Edit
बारामती:- महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे मार्फत घेण्यात आलेल्या उपकार्यकारी अभियंता वर्ग २ व अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्ग १ या परीक्षांचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्ग १ या पदासाठी बारामती तालुक्यातील पणदरे (हनुमान वाडी)येथील ऐश्वर्या कीर्तने यांची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त होत आहे.
ऐश्वर्या कीर्तने महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी उपकेंद्र लोणी कंद ४०० के.वी.येथे सहाय्यक अभियंता वर्ग २ या पदावर सध्या कार्यरत आहेत, विशेष म्हणजे उपकार्यकारी अभियंता वर्ग २व अतिरिक्त कार्य कारी अभियंता वर्ग १ या दोन्ही परीक्षेत कीर्तने उत्तीर्ण झाल्या आहेत.
सन २००९ च्या १२ वी एच एससी बोर्डाच्या गुणवत्ता यादीत पुणे विभागात ऐश्वर्याने २ रा क्रमांक व ओबीसी प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवला होता.