
अनेकान्तच्या जवाहर शाह वाघोलीकर यांच्या वाढदिवसा निमित्त भव्य रक्तदान शिबिर
![]() |
रक्तदान शिबिराचे उद्घाटन करतांना मान्यवर डाॅक्टर्स व अनेकान्तचे मान्यवर
बारामती :- अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त अने कान्त एज्युकेशन सोसायटीमध्ये सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करण्यात येत आहे.
यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन संस्थेमध्ये करण्यात आले आहे.सोमवार दि.१४ जुलै रोजी जिवराज सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे सचिव मिलिंद शाह वाघोलीकर यांच्या हस्ते झाले.संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली.या रक्तदान शिबिरात संस्थेतील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी स्वखुषीने रक्तदान केले.इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित स्व.माणिकबाई चंदुलाल सराफ या ब्लड सेंटर यांच्या सहाय्याने १०२ रक्ताच्या संकलित करण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर,सचिव मिलिंद शाह वाघोलीकर,डॉ.प्रितम व्होरा, डॉ.हर्षवर्धन व्होरा उपस्थित होते.
रक्तदान शिबिरासाठी प्राचार्य डॉ. अविनाश जगताप,प्राचार्य डॉ. दर्शन शहा, प्राचार्य डॉ. प्रणाली वडेर,प्राचार्य धनंजय बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले.