.jpeg)
गजानन पाटील व विजयसिंह देशमुख यांची "आयएएस" मध्ये पदोन्नती
बुधवार, १६ जुलै, २०२५
Edit
पुणे:- पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) पदोन्नती मिळाली आहे. याबाबतची अधिसूचना केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. श्री पाटील यांच्यासह राज्याच्या महसूल विभागातील बारा अधिकाऱ्यांना 'आयएएस' मध्ये पदोन्नती देण्यात आली.
श्री. पाटील यांनी बारामती, खेडचे प्रांताधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ दिल्ली, मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक आदी विविध पदांवर काम केले. त्यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नुकतीच नियुक्ती झाली. त्यांनी स्मार्ट स्कूल स्मार्ट आरोग्य केंद्राच्या पथदर्शी प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले, तसेच श्री. पाटील यांनी खेडचे प्रांताधिकारी असताना शिवनेरी संवर्धन प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता. या आराखड्यामुळे शिवनेरी किल्ल्याचा जागतिक वारसा यादीत समावेश होण्यासाठी फायदा झाला.