'समोसा, जिलबी अन् लाडू'बाबत सरकारने खरंच काही इशारा दिला आहे का?
कारण, पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत माहिती दिली आहे आणि म्हटले आहे की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या अडव्हाझरीत विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांवर कोणतेही इशारा लेबल नाही किंवा त्यात भारतीय स्नॅक्सबद्दल कोणतेही विशिष्ट निर्देशही दिले गेले नाहीत.
पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, हा सामान्य सल्ला कोणत्याही विशिष्ट अन्न उत्पादनासाठी नाही तर सर्व अन्न उत्पादनांमध्ये लपलेल्या चरबी आणि अतिरिक्त साखरेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी एक व्यावहारिक प्रेरणा आहे.
हा सल्ला कामाच्या ठिकाणी निरोगी पर्याय आणि उपक्रमांसाठी आहे. तसेचन लोकांना निरोगी आहार आणि जीवनशैलीसाठी अतिरिक्त तेल आणि साखरेचे सेवन कमी करण्यासाठी लोकांना निरोगी पर्याय निवडण्याचे आवाहन करतो. हे भारताच्या समृद्ध स्ट्रीट फूड संस्कृतीला लक्ष्य करत नाही.
यापूर्वी असे म्हटले जात होते की, भारतातील लोकप्रिय खाद्यपदार्थ जसे की समोसे, जिलबी आणि वडापाव इत्यादींवर लवकरच सार्वजनिक ठिकाणी आरोग्यविषयक जनजागृतीबाबतच्या सूचना दिसतील.
शिवाय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक नवीन जागरूकता मोहीम सुरू केली आहे ज्यामध्ये सर्व केंद्र सरकारी संस्थांना सिगारेटच्या पाकिटांवर जसे इशारे असतात तसेच रोजच्या सॅक्समध्ये चरबी आणि साखरेचे प्रमाण दर्शविणारे बोर्ड लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हे खोटे असल्याचे आढळून आले आहे.