रविवारी एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने बारामतीत मधुमेहावर आरोग्य संवाद

रविवारी एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या वतीने बारामतीत मधुमेहावर आरोग्य संवाद

 

बारामती :-  येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने रविवार दि.१३ जुलै संध्याकाळी सहा वाजता गदिमा सभागृहात प्रतिबिंब अंतर्गत आरोग्य संवाद या आरोग्यविषयक उपयुक्त कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा, खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली. 

      आरोग्य संवाद कार्यक्रमाचे दरम्यान डॉ.प्रसाद राजहंस,डॉ. अश्विनी जोशी,डॉ.राहुल कुलकर्णी व डॉ.वैभवी उपाध्ये हे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर "वाढता मधुमेह व आवश्यक जीवन पध्दत,विस्मृतीचे आजार व ते टाळण्याचे मार्ग,जीवनरेखा" (प्रथमोपचार प्रात्यक्षिके) या विषयावर बारामतीकरांशी संवाद साधत शेवटी योगासनांची प्रात्यक्षिकेही सादर करणार आहेत.

      तज्ञांकडून मानसिक व शारि रीक स्वास्थ्याचे महत्व बारामती करांना या माध्यमातून जाणून घेता येईल,असे पवार यांनी सांगितले.प्रतिबिंब व्याख्यान मालेअंतर्गत विविध विषयांवर मान्यवरांना बारामतीत आणून त्यांचा सुसंवाद नागरिकांशी घडवून देण्याचे काम एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या माध्यमातून दर महिन्यात केले जाते.या आरोग्य संवाद कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तरे होणार असून शंकानिरसनही केले जाणार आहे.