
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम -- शहराध्यक्ष जय पाटील
बारामती :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसची नुकतीच एक बैठक पार पडली.यावेळी बैठकीत २२ जुलैनिमित्त भरगच्च सामाजिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली.
सदरच्या बैठकीला शहर महिलाध्यक्षा अनिता गायकवाड, युवक अध्यक्ष अविनाश बांदल सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी जय पाटील म्हणाले २२ रोजी शहरात महारक्तदान शिबिर पार पडणार आहे.यापूर्वी ३ हजार बाटल्या रक्तसंकलनाचा उच्चांक केला होता.यंदा तो मोडून अधिक रक्त संकलन केले जाणार आहे.
शहराच्या विविध भागात वृक्षारोपण केले जाणार आहे. गतवर्षी १० हजार वृक्ष वाटप शहरात करण्यात आले होते. याशिवाय शहरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. हे आरोग्य शिबिर महिला,पुरुष, लहान मुलांसह ज्येष्ठांसाठी खुले आहे.शिबिरात पुणे शहर आणि बारामतीतील तज्ञ डॉक्टर आरोग्य तपासणी करणार आहेत. यामध्ये हाडांची तपासणी, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, हृदयरोग तपासणी, मधुमेह, मूत्रविकार तपासणी, मुत्राशय व किडनीचे आजार, ब्लड प्रेशर,इसीजी,हृदयाचे ठोके,
रक्तातील ऑक्सिजन तपासणी, व्हेरीकोज व्हेन्स तपासणी कर ण्यात येणार आहे. महिलांसाठी हिमोग्लोबिन,किडनी,लिव्हर, कोलेस्ट्रॉल,कॅल्शियम, थायरॉइड,कॅन्सर स्क्रीनिंग, मार्कर टेस्ट,हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफेरोसिस तसेच लहान मुलांसाठी बालदमा,थायरॉइड बालरोग तपासणी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष जय पाटील म्हणाले.