पाटस टोलनाक्यावर ३१ लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त!
ही माहिती पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. पुणे सोलापूर महामार्गावर बेकायदेशीररित्या चारचाकी वाहनांमध्ये मद्यसाठा वाहतूक होत असल्याची माहिती दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार दौंड राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाटस टोल नाक्यावर सापळा रचला आणि सोलापूर कडून पुणे दिशेला जाणारी एक चारचाकी संशयित वाहन अडवून तपासणी केली.
यावेळी या वाहनांमध्ये गोवा राज्य निर्मित ‘रॉयल क्लासिक व्हिस्की’ चे 43 बॉक्स (300 बाटल्या) आढळून आल्या. यामध्ये एकूण 31.56 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष मारकड आणि वैभव तरंगे या दोघांना अटक केली आहे. या पथकाने पुणे जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकुन मोठी कारवाई केली.
या कारवाईत एकूण 4 हजार 779 बुचेस, 84 बॉक्स मद्य, चार चारचाकी वाहने आणि विविध हॉटेल व घरांमध्ये सापडलेला अवैध साठा असा मिळून 31 लाख 56 हजार 495 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अशी माहीती पोलिसांनी दिली.