भाजप अध्यक्षपदासाठी 'या' माजी मुख्यमंत्र्यांची निवड निश्चित? संघाचे 'हे' निकष ठरले महत्त्वाचे

भाजप अध्यक्षपदासाठी 'या' माजी मुख्यमंत्र्यांची निवड निश्चित? संघाचे 'हे' निकष ठरले महत्त्वाचे

 


नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आगामी अध्यक्षपदासाठी  हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजते. आगामी पावसाळी अधिवेशनाआधी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

राजकीय वर्तुळात आणि संघाशी संलग्न तज्ज्ञांच्या माहितीनुसार, खट्टर यांची निवड ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार झाली असून, या प्रक्रियेत संघाचे अदृश्य पण ठोस प्रभाव दिसून आला आहे.

संघाचे निकष ठरले महत्त्वाचे

संघाने अध्यक्षपदाच्या निवडीसाठी काही मूलभूत निकष सुचवले होते. यामध्ये जातीय समीकरणे वा निवडणूक लाभापेक्षा संघटनात्मक क्षमता आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची कौशल्ये यांना अधिक प्राधान्य देण्याचा आग्रह होता.

याच पार्श्वभूमीवर, मनोहर लाल खट्टर यांच्याकडे संघटनेत जवळपास चार दशकांचा अनुभव असल्याने त्यांची निवड संभाव्य मानली जात आहे. त्यांचा संघाशी दीर्घ संबंध, विविध राज्यांत निवडणूक प्रभारी म्हणून कार्य आणि तळागळातील कार्यकर्त्यांशी असलेला प्रत्यक्ष संवाद हे सर्व घटक त्यांच्या बाजूने गेले.