
८५४ दात्यांचे संत निरंकारी मिशनच्या शिबिरात रक्तदान
शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५
Edit
स्वातंत्र्य दिनानिमित्त संत निरंकारी मिशन,शाखा सिडको-छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने शुक्रवारी एन-९ येथील सिडको सत्संग भवन मध्ये आयोजित रक्तदान शिबिरा मध्ये तब्बल ८५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते झाले.यावेळी आ.प्रदीप जैस्वाल,डॉ.भारत सोनवणे,सातारा झोनचे ज्ञान प्रचारक नवनाथ शेलार,पूर्व झोनल इन्चार्ज कन्हैयालाल डेब्रा,पूर्वक्षेत्रीय संचालक हरिलाल नाथानी तसेच जिल्हा संयोजक डी.जी.दळवी यांची उपस्थिती होती.रक्तसंकलन हे घाटीतील विभागीय रक्त केंद्रातर्फे करण्यात आले.