वाहने नियोजित जागेवरच पार्किंग करावीत-अपर पो.अधिक्षक गणेश बिरादार

वाहने नियोजित जागेवरच पार्किंग करावीत-अपर पो.अधिक्षक गणेश बिरादार

 

बारामती:- महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आवारातील वाहने नियोजित जागेवरच वाहने पार्कींग करावीत,वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, आणि नियमांंचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करावी,असे स्पष्ट निर्देश अपर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार यांनी आज रोजी दिले. 

      बारामती विमानतळ ते पेन्सिल चौक एमआयडीसी आवारातील रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंग समस्या आणि उपाय योजनांबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मंगळवारी (दि.१९ऑगस्ट ) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळीउपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड दुरदृष्यप्रणाली द्वारे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम आदी उपस्थित होते.

    श्री.बिरादार म्हणाले,वाहतुक सुरक्षा विषयक नियमाबाबत माहिती देण्यासह वाहन धारकां च्या बैठकीचे आयोजन करावे.

वाहने रस्त्यांवर उभी करु नयेत. याबाबत चालकांना एमआयडी सी आणि कंपनीने सूचना द्याव्यात.वाहतूक सुरक्षितेच्या नियमाचे पालन करावे असे सर्व कंपनीतील सर्व कर्मचारी व अधिकारी यांना माहिती देण्यात यावी,असेही श्री.बिरादार म्हणाले.

    श्री.नावडकर म्हणाले,ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी वाहतूकीच्या अनुषंगाने सूचना केल्या,या सुचनांबाबत प्रशासनाच्या वतीने सकारात्मक विचार करण्यात येईल,असे श्री. नावडकर म्हणाले.

       श्री.हनुमंत पाटील म्हणाले, एमआयडीसी परिसरातील  वाहतुक कोंडी सोडवण्याकरिता वाहन पार्किंगच्या अनुषंगाने नियोजन करण्यात येईल.वाहनां करिता टर्मिनल तयार करुन त्यावर वाहनांची पार्कींग करण्याबाबत कंपनीला सूचना देण्यात आल्या.वाहनांना पार्किंगकरिता पार्किंग यार्ड  नेमून देण्यासह वाहन चालकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी सुचना श्री. पाटील यांनी केली.

      यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तालुका पोलिस निरीक्षक वैशाली पाटील,नायब तहसीलदार पी.डी.शिंदे,ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष ॲड. तुषार झेंडे पाटील,तालुका अध्यक्ष संजीव बोराटे,एमआय डीसी परिसरातील पिॲजिओ कंपनी, गजानन ॲग्रो कंपनी, बारामती कॅटल फुड कंपनी, भारत फोर्ज कंपनी,मोरया गोदरेज व डायनामिक्स आदी कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.