अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात; दोन दिवस भाविकांसाठी मूळ मूर्तीचे दर्शन बंद
रविवार, १० ऑगस्ट, २०२५
Edit
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची संवर्धन प्रक्रिया सोमवारी (दि. 11) व मंगळवारी (दि. 12) करण्यात येणार आहे. या दोन दिवसांमध्ये भाविकांसाठी मूळ मूर्तीचे दर्शन बंद राहणार असून उत्सवमूर्ती व कलश दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.
केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने अंबाबाई मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव 16 एप्रिल 2024 रोजी देवस्थान समितीने पुरातत्त्व विभागाला पाठवला होता. त्यानुसार 12 जून 2025 रोजी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने आवश्यक ती संवंर्धन प्रक्रिया करावी, असे पत्र पाठवले होते.