
अमित साटम भाजपचे नवे मुंबई अध्यक्ष
सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५
Edit
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा निर्णय घेतला आहे. आमदार अमित साटम यांची भाजपच्या मुंबई अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज (दि. २५) त्यांच्या नावाची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अमित साटम यांनी भाजपमध्ये संघटनात्मक जाबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. विधानसभेत अभ्यासू आणि आक्रमक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. त्यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे. येणाऱ्या काळात साटम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.