बारामतीच्या सान्वी प्रिया अमरेंद्र महाडीक हिची जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड

बारामतीच्या सान्वी प्रिया अमरेंद्र महाडीक हिची जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड

 

बारामती: बालरंग भूमी परिषदेच्या वतीने नुकतीच तालुकास्तरीय आंतरशालेय नाट्यछटा स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये तालुक्यातील इयत्ता पाचवी ते सातवी गटामध्ये तब्बल १४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या गटातील स्पर्धेतून विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपळी येथील विद्यार्थिनी सान्वी प्रिया अमरेंद्र महाडीक हिने ऑफ पिरियडची मजा या विषयावर सादर केलेली नाट्यछटा परीक्षकांनी निवडून तिला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडले.

बारामती तालुक्यातून एकूण १४ मुलींची जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यामध्ये सान्वी प्रिया अमरेंद्र महाडीक हिचाही समावेश आहे. सान्वीचं जिल्हास्तरीय सादरीकरण येत्या २४ ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार आहे.

सान्वीला या नाट्यछटेच्या तयारीसाठी तिच्या शाळेतील शिक्षिका ज्योती दिसले व अर्चना देव यांनी मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख लीला शेट्टी यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. सान्वीच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका तनुश्री गोरे यांनी तिचं मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.