
लाडक्या बहीणचा रक्षाबंधनाला मिळणार हप्ता
पुणे:- राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळेग राज्यातील लाखो बहिणींना दरमहा आर्थिक आधाराचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट १५०० रुपयांची मासिक मदत जमा केली जाते. रक्षाबंधनाचा
सण लक्षात घेता, राज्य शासनाने जुलैचा हप्ता ९ ऑगस्टपूर्वी लाभार्थी बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने एकूण ७४६ कोटींचा निधी वितरित केला आहे.
या योजनेच्या निधी वितरणासाठी बीम्स प्रणालीचा वापर करण्यात आला असून, पारदर्शक व वेळेवर निधी स्थानांतरण सुनिश्चित केले गेले आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या या योजनेमुळे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली आहे. या निर्णयाचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत करताना नमूद केले की, हा निर्णय आर्थिक मदतीपुरता मर्यादित नाही, तर तो महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रेरणादायी टप्पा आहे. तो मानवी मूल्यांशी जोडलेला आणि सामाजिक समतेची जाणीव असलेला आहे.'