तापजन्य आजारामुळे ड्रॅगन फ्रूट खातोय भाव
बुधवार, ६ ऑगस्ट, २०२५
Edit
पुणे: वातावरणातील बदलांमुळे सध्या तापजन्य आजार वाढू लागल्याने बाजारात ड्रॅगनच्या फळांना मागणी वाढली आहे. या फळांचा हंगाम बहरल्याने बाजारात फळेही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. बाजारात होत असलेल्या आवकच्या तुलनेत मागणी चांगली असल्याने ड्रॅगनच्या फळांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात ड्रॅगन फळाला दर्जानुसार किलोला 40 ते 80 रुपये भाव मिळत आहे.
परदेशी असूनही देशात हे फळ लोकप्रिय झाले आहे. जून ते ऑक्टोबर असणार्या फळाचा हंगाम असतो असतो. लाल आणि पांढर्या रंगाचे ड्रॅगन असतात. नागरिकाकडून लाल रंगाच्या ड्रॅगनला अधिक मागणी असते. त्यामुळे तुलनेने लाल ड्रॅगनला अधिक भाव मिळतो.
सध्या बाजारात दाखल होणार्या मालामध्ये 90 टक्के माल लाल रंगाचा आहे. सद्य:स्थितीत मार्केटयार्डातील फळ विभागात दररोज 10 ते 15 टन आवक होत आहे. बाजारात सोलापूर, पुणे, सातारा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून आवक होत आहे. शहर, उपनगरासह पर्यटन स्थळातून फळाला मागणी आहे. स्थानिक बाजारपेठेसह दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू येथूनही फळाला मागणी आहे.