बारामती मधील विमानतळा जवळील रेल्वे गेट साठी नागरिकांचे आंदोलन; तर उड्डाण पुलाचा वापर करा : रेल्वे प्रशासन

बारामती मधील विमानतळा जवळील रेल्वे गेट साठी नागरिकांचे आंदोलन; तर उड्डाण पुलाचा वापर करा : रेल्वे प्रशासन


 बारामती:- बारामती एमआयडीसी मधील विमानतळ नजीक असलेले रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद करून नागरिक व सावंतवाडी गोजुबावी,तांदूळवाडी,उंडवडी, कटफळ आदी ग्रामस्थांनी आंदोलन (रविवार १० ऑगस्ट) करून रेल्वे प्रशासनाने रेल्वे गेट बंद करू नये अशी मागणी केली.

रेल्वे रूळ ओलांडून कटफळ चौक कडून विमानतळ,सावंतवाडी गोजुबावी, तांदुळवाडी, उंडवडी आदी परिसरात जाता येते तर तिकडून रेल्वे रूळ ओलांडून एमआयडीसी मधील विविध कंपन्यात व कटफळ,वंजारवाडी आदी परिसरात जाता येते.

रेल्वे रुळाच्या अलीकडे म्हणजेच एमआयडीसी परिसरात विविध कंपन्यात येणारे कर्मचारी, अधिकारी यांची संख्या मोठी आहे व दोन्ही बाजूला अनेक छोटे मोठे हॉटेल्स,धाबे, पेट्रोल पंप,व इतर व्यवसायिक यांची संख्या मोठी आहे.

एमआयडीसी स्थापन झाल्यापासून रेल्वे रुळाच्या उजव्या डाव्या बाजूला नागरिक कामानिमित्त,व्यवसाय निमित्त येजा करतात परंतु बारामती एमआयडीसी मधून संत तुकाराम महाराज उड्डाण पुल झाल्याने आता उड्डाण पूल वापरा असे रेल्वे प्रशासन यांचे म्हणणे आहे. उड्डाण पूल वापरल्यास पाच ते सहा किलो मीटर अंतर जास्त पडते उड्डाण पूल वंजारवाडी हद्दीत सुरू होतो व गोजुबावी हद्दीत संपतो मधल्या भागातील एमआयडीसी मधील विविध कंपन्यात कामाला जायचे असेल किंवा व्यवसाय निमित्त यायचे असेल तर पाच सहा किलोमीटर अंतर वाढते वेळ,व पैसा जातो म्हणून रेल्वे गेट बंद करू नये असे नागरिकांचे व स्थानिक ग्रामस्थांचे म्हणने आहे .

याचा परिणाम छोट्या व्यवसायिक यांच्यावर होणार असून अंतर वाढत असल्याने ग्राहक येणार नाहीत कायमस्वरूपी व्यवसाय बंद करावा लागेल म्हणून गेट बंद करू नये परंतु उड्डाण पूल चालू ठेवा ज्यांना रेल्वे रुळावरून जायचे ते जातील व ज्यांना उड्डाण पुलावरून जायचे ते उड्डाणपुलाचा वापर करतील असे व्यवसायिक यांचे म्हणणे आहे. तर रेल्वे रूळ ओलांडून जाण्यासाठी आता बंदी असून नागरिकांनी उड्डाण पुलाचा चा वापर सुरू करावा असे रेल्वे प्रशासन चे म्हणणे आहे.

अजित पवार: उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,

राज्य शासनाने केंद्र शासनाला लिहून दिले आहे की ज्या भागात हाय वे साठी उड्डाण पूल झाला आहे त्या ठिकाणचे पूर्वीचे रेल्वे गेट बंद करावेत व उड्डाण पूल ची वाहतूक सुरळीत पणे सुरू करून द्यावी. जेणे करून नागरिक रेल्वे गेट पार करताना अपघात होऊ नयेत.