वाहतूक कोंडीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे पोलिसांवर संतापले

वाहतूक कोंडीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे पोलिसांवर संतापले

 

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार आज (दि.८) पहाटेपासूनच चाकण दौऱ्यावर होते. दरम्यान ते चाकण चौकात पाहणी करताना पोलिसांनी वाहतूक रोखून ठेवली. यामुळे वाहनांची मोठी कोंडी झाली. यावरून अजित गरमीचा प्रचंड त्रास आणि वाहनांची वाढती रांग पाहून दादा संतापले. यावरून त्यांनी चांगलेच खडसावले.

अजित पवारांनी पोलिसांना खडसावले

अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान पोलिसांनी वाहतूक रोखून धरल्याने चौकात मोठी कोंडी झाली. हे पाहताच त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना जाहीरपणे खडसावले. "ओ चौबे, हे बरोबर नाही. मूर्खासारखं ही वाहनं थांबवून कोंडी का केली? सगळी वाहतूक सुरू करा," अशा कठोर शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अचानक मिळालेल्या या फटकारामुळे पोलीस यंत्रणेतही हलचल निर्माण झाली. तर उपस्थितांनी हे दृश्य पाहताच परिसरात चर्चेचा विषय रंगला.

पहाटेच्या दौऱ्यात वाहतूक कोंडीवर प्रहार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कामाच्या धडाकेबाज शैलीचे दर्शन घडवत आज पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनीचाकणमध्ये दाखल होऊन वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पीएमआरडीए, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. "तुम्ही नागरिकांनी खूप त्रास सहन केला आहे, तुमची सहनशीलता कौतुकास्पद आहे. पण आता या त्रासातून तुमची सुटका करायची आहे," असे म्हणत त्यांनी नागरिकांना दिलासा दिला. तळेगाव ते शिक्रापूर हा मार्ग सहा पदरी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे तसेच पुणे-नाशिक मार्गावर उन्नत (Elevated) मार्ग उभारणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

पवारांच्या घोषणेमुळे जिल्ह्याची प्रशासकीय रचना बदलणार?

अजित पवारांची ही घोषणा केवळ पायाभूत सुविधांची निर्मिती नसून, पुणे जिल्ह्याच्या प्रशासकीय रचनेत आमूलाग्र बदल घडवणारी आहे. या नव्या महानगरपालिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम होतील आणि नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्यातील आव्हाने कशी पेलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्यवसायात राजकारण आणू नये...; दादांचा हॉटेल मालकाला सल्ला

एका हॉटेल मालकाने नाश्त्याची विनंती केली असता, "पुढच्या वेळी नक्की जेवेन, पण तेव्हा माझं बिल घेऊ नका," अशी मिश्किल टिप्पणी देखील अजित पवार यांनी यावेळी केली. मात्र, लगेचच त्यांनी व्यवसायात राजकारण आणू नये, असा मोलाचा सल्लाही दिला. "हॉटेलमध्ये कोणीही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल," असे ते म्हणाले.