
फलटण येथे रविवारी बाल संत समागमचे आयोजन !
हा समागम संत निरंकारी मिशनचे युवा प्रचारक नरेंद्र मोरे जी (मुंबई) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या समागमसाठी फलटण सातारा जिल्ह्यासह बारामती, इंदापूर आदी भागातून पाचशे हुन अधिक बालके उपस्थित राहणार असल्याचे सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी सांगितले.
आजची बालके उद्याची सुशिक्षित पिढी घडण्यासाठी शाळेतील धडे मिळतीलच पण त्या बरोबर त्यांना आदर्श व सुसंस्कारित नागरिक घडण्यासाठी शिक्षणाबरोबर आध्यात्मिकतेचा संघ असणेही तितकंच महत्वाचे असल्याने या समागम चे आयोजन केले असल्याचे श्री. झांबरे यांनी सांगितले.
सदरचा बाल समागम व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी सातारा झोनचे झोनल प्रभारी नंदकुमार झांबरे, बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने, सातारा क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक दीपक शेलार या प्रमुखांसह आजूबाजूचे मुखी तथा संयोजक तसेच सर्व शाखांचे सेवादल अधिकारी, सेवादल, सेवादल भगिनी विशेष परिश्रम घेणार आहेत.