इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

 

गुगलने तंत्रज्ञान विश्वात धमाका केला आहे. नव्याने लाँच झालेल्या पिक्सेल 10 सिरीजमधील एका अनोख्या फीचरने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आता वापरकर्ते इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्कशिवायही व्हॉट्सअ‍ॅपवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकतील. सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध होणार असून आपत्कालीन परिस्थितीत हे फीचर वरदान ठरणार आहे.

गुगलने भारतासह जागतिक बाजारपेठेत पिक्सेल 10 सिरिज लॉंच केली आहे जी 28 ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीच्या दाव्यानुसार सॅटेलाइट तंत्रज्ञानाद्वारे व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंग ऑफर करणारी ही जगातील पहिली स्मार्टफोन सिरिज आहे. यामुळे नेटवर्क नसलेल्या दुर्गम भागातही संवाद साधणे शक्य होईल. गुगलने आपल्या एक्स पोस्टमध्ये एक टीझर शेअर केला आहे ज्यामध्ये सॅटेलाइटद्वारे कॉलिंगची झलक दिसते. हे फीचर विशेषतः अशा ठिकाणी उपयुक्त ठरेल जिथे मोबाइल नेटवर्क किंवा वायफाय उपलब्ध नसते.