चंदुकाका सराफतर्फे आयोजित कार्यक्रमात  "मंगळागौर स्पर्धेत माहेरचं आंगण ग्रुपचा डंका" मिळाले पहिले पारितोषिक

चंदुकाका सराफतर्फे आयोजित कार्यक्रमात "मंगळागौर स्पर्धेत माहेरचं आंगण ग्रुपचा डंका" मिळाले पहिले पारितोषिक

 

बारामती:- बारामती नगरीमध्ये नुकत्याच २२ तारखेला चंदुकाका सराफ यांनी मंगळागौर स्पर्धा आयोजित केल्या होत्या.यामध्ये बारामती तील एकूण सात ग्रुपने सहभाग नोंदवला.यामध्ये माहेरचं आंगण ग्रुपने सहभाग घेऊन पहिला क्रमांक पटकावला.ट्रॉफी आणि बक्षीस देण्यात आले,माहेरचं अंगण ग्रुप स्थापने पासूनच आपल्या नावाचा डंका वाजवत आघाडीवर राहिला आहे.   

माहेरचं आंगण ग्रुपच्या अध्यक्षा सौ.शुभांगी महाडीक यांनी आपली स्वरचित गाणी स्वतः म्हणून पेटी व तबल्याच्या ठेक्यावर त्यांनी उपस्थित  सर्वांना ताल धरायला लावला.    

    या कार्यक्रमातून आपली संस्कृती,परंपरा,रूढी यांची माहिती महिलांपर्यंत पोहोचावी आणि आपली ही महाराष्ट्राची संस्कृती,परंपरा यांची माहिती महिलांपर्यंत पोहोचावी आणि आपली ही महाराष्ट्रीयन जुनी संस्कृती यापुढेही जोपासली जावी,नवीन पिढीला हे माहित व्हावे हे त्यांनी या कार्यक्रमातून दाखवून दिले. माहेरचं आंगण ग्रुपची स्थापना तीस वर्षापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये करण्यात आली.३० वर्षे माहेरचं आंगण ग्रुप हे मंगळागौर,डोहाळे जेवण,बारस नवरात्र आणि असे पारंपारिक कार्यक्रम ते या माध्यमातून करत आहेत.या मंडळाची स्थापना,संकल्पना प्रारंभापासून संस्थापक श्रीमती सुशिलाताई तिवाटणे,वसुधा वाघ,सौ.शुभांगी महाडीक,अ‍ॅड. नंदू भागवत,सौ.सरोज सुमंत यांचे या मंडळासाठी योगदान मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. तेंव्हापासून ते आजपर्यंत... आणि या पुढेही न थांबता कार्यरत राहील.जिद्द,ध्येय व चिकाटी आणि सातत्य असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होते ते या मंडळातून दिसून येते. माहेरचं आंगण ग्रुपमध्ये सौ.सरोज सुमंत,सौ.संध्या मदने, पद्मा म्हेत्रे,अनुराधा सपकळ,ज्योती गाडे,पल्लवी म्हेत्रे, सुरेखा घोरपडे,सुरेखा भागवत,सुरेखा बाचल,पुष्पा जगताप,मनीषा जोशी,विजया कारंजकर,सोनाली जाधव, वैशाली जाधव,वैशाली पाटील, पुष्पा जगताप,यांचेसह स्वाती खामगळ व वेदांत आटोळे, प्रणव पंडीतआदी सदस्य आहेत.

     शनिवार दि.२३ ऑगस्ट रोजी मलाबार गोल्ड डायमंड आणि एडीबी ग्रुप यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही माहेरचं आंगण ग्रुपने बक्षीसे व ट्रॉफी मिळवली. त्याचप्रमाणे सौ.सुरेखाताई बाचल यांनी प्रत्येक गाण्या अगोदर निवेदन करून  गाण्यांची माहिती त्या सांगत असतात.