बारामती ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी माधव जोशी-सर

बारामती ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी माधव जोशी-सर

 

कार्यकारणी जाहीर ; जोशी यांची सलग १६ वर्षे निवड

बारामती :- येथील ज्येष्ठ नागरिकांचे हित जोपासत,एक मेकांना जोडणारे हसमुख व्यक्ती मत्व,आरोग्य,सल्ला,मनोरंजन,मार्गदर्शन व सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची संधी उपलब्ध करणारे,गेली १५ वर्षे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे माधव वामन जोशी-सर यांची ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी सलग सोळाव्या वर्षी फेरनिवड करण्यात आली आहे.

      १८ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक संघाचे सभागृहात संघाची सर्वसाधारण सभा पार पडली.या सभेत कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

अध्यक्ष- माधव वामन जोशी उपाध्यक्ष- गणेश मोरेश्वर देव, सचिव- प्रकाश गंभीरमल मेहेर

सहसचिव- श्रीमती प्रा.रजनी कृष्णकांत सुर्वे,खजिनदार - प्रकाश पुरूषोत्तम खंडागळे, सहखजिनदार -राजाराम कृष्णाजी भुजबळ, कार्यकारिणी सदस्य <>

तुकाराम विठ्ठल मोरे,सौ.शुभांगी दत्तात्रय महाडीक,सौ.मंगल सोपानराव बोरावके यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

 नूतन कार्यकारिणीची शुभेच्छा.