ऊस तोडणी मजुरांची कमतरता; माळेगाव कारखान्याकडून ऊस तोडणी यांत्रिकीकरणाला प्राधान्य

ऊस तोडणी मजुरांची कमतरता; माळेगाव कारखान्याकडून ऊस तोडणी यांत्रिकीकरणाला प्राधान्य

 

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखाना लि.ने ऊस तोडणी मजुरांची कमतरता लक्षात घेऊन यांत्रिकीकरणाला प्राधान्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कारखाना व्यवस्थापनाने सभासदांना १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

कारखान्याच्या परिपत्रकानुसार, मजुरांची घटती उपलब्धता पाहता यांत्रिक ऊस तोडणी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे २०२५–२६ गाळप हंगामापासून को ८६०३२ जातीच्या ऊसाची, १५ जुलै २०२५ रोजी नोंदणीकृत प्लॉटची, मुळाक्षर बंधनाशिवाय यंत्राद्वारे प्राधान्याने तोडणी केली जाईल. नोंदणीनंतर शेती विभागाद्वारे सभासदांच्या प्लॉटची पाहणी होईल. यंत्राद्वारे तोडणीस योग्य प्लॉटचे गट तयार करून प्राधान्याने तोडणी होईल, ज्यामुळे ऊस वेळेत गाळपासाठी पोहोचेल.

सभासदांनी नोंदणीसाठी शेती विभागाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी मुख्य शेतकी अधिकारी धनंजय लिंबोरे (मो. ९६२३४५४१७५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यकारी संचालक अशोक पाटील, कमिटी अध्यक्ष नितीन सातव, उपाध्यक्ष संगिता कोकरे आणि चेअरमन अजित पवार यांनी केले आहे.