
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
कोल्हापुरात वनतारा विरोधात मोठी मोहिम सुरू झाली आहे. या मोहिमेची दखल घेत वनताराचे पथक कोल्हापूरात आले होते. त्यांनी मठातील स्वामींची भेट घेतली.
राजू शेट्टींचा गंभीर आरोप
दरम्यान, यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केला. पेटा संघटनेच्या तक्रारीवरून महादेवी हत्तीला गुजरातच्या वनताराला पाठवण्यात आले आहे. हा सर्व षडयंत्राचा भाग होता, असा गंभीर आरोप केला. त्यासाठी आत्मक्लेष पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचे शेट्टी म्हणाले.
"जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला गेला. संस्कृती, इतिहास, परंपरा, वारसा या सगळ्या गोष्टी समाज म्हणून गेल्या १२०० वर्षापासून नांदणी मठाकडून जपल्या जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे शासनाचे हत्ती संगोपन केंद्र आहे. शिवाय कर्नाटक,केरळ येथेही हत्ती पुनर्वसन केंद्र असताना तो नेमका ‘वनतारा’कडे सुपूर्द करण्यास सांगितले जाण्याचे कारण काय?", असा सवालही शेट्टी यांनी केला.