
रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर साठी विशेष रेल्वे; बघा एका क्लिक वर
जळगाव : रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिन यानिमित्त व सप्ताहाच्या सुट्टी त्या दिवशी मुंबई-नागपूर नागपूर-मुंबई, पुणे-नागपूर-पुणे अशा दोन विशेष रेल्वे लांब सुट्टीच्या सप्ताहामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे धावणार आहेत.
रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे विशेष ट्रेन चालवणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष ट्रेन
01123 विशेष ट्रेन - शनिवार दि. 9 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 00.20 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 15.30 वाजता पोहोचेल.
01124 विशेष ट्रेन - दि. 10 ऑगस्ट रोजी नागपूर येथून 14.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 05.25 वाजता पोहोचेल.
प्रवासा दरम्यान लागणारे थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
गाडीची संरचना अशी आहे : 2 वातानुकूलित तृतीय, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय, 2 द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष ट्रेन
02139 विशेष ट्रेन - दि.15 ऑगस्ट आणि दि. 17 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 00.20 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी 15.30 वाजता पोहोचेल. (दोन सेवा दिल्या जाणार आहे)
02140 विशेष ट्रेन - दि.15 ऑगस्ट आणि दि. 17 ऑगस्ट रोजी नागपूर येथून 20.00 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी 13.30 वाजता पोहोचेल.
प्रवासा दरम्यान लागणारे थांबे - दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
गाडीची संरचना अशी आहे : 2 वातानुकूलित तृतीय, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय, 2 द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन.
पुणे – नागपूर विशेष ट्रेन (दोन सेवा राहणार आहेत)
01469 विशेष ट्रेन - दि. 8 ऑगस्ट रोजी पुणे येथून 19.55 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी 14.45 वाजता पोहोचेल. (एकच सेवा देण्यात येणार असल्याची नोंद घ्यावी)
01470 विशेष ट्रेन - दि. 10 ऑगस्ट रोजी नागपूर येथून 13.00 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 05.20 वाजता पोहोचेल. (एकच सेवा देण्यात येणार असल्याची नोंद घ्यावी)
प्रवासा दरम्यान लागणारे थांबे - दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
गाडीची संरचना अशी आहे - 2 वातानुकूलित तृतीय, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन.
पुणे – नागपूर विशेष ट्रेन (चार सेवा देण्यात येणार आहेत)
01439 विशेष ट्रेन - दि. 14 आणि दि. 16 ऑगस्ट रोजी पुणे येथून 19.55 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी 14.45 वाजता पोहोचेल.
01440 विशेष ट्रेन - दि. 14 आणि दि. 17 ऑगस्ट रोजी नागपूर येथून 16.15 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 07.20 वाजता पोहोचेल.
प्रवासा दरम्यान लागणारे थांबे -दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
गाडीची संरचना अशी आहे - 2 वातानुकूलित तृतीय, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 द्वितीय आसन व्यवस्था व सामान गार्ड ब्रेक व्हॅन असेल.
असे करा आरक्षण
विशेष गाड्यांसाठी आरक्षण हे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर करण्याची सोय उपलब्ध असून तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे.
गाडी क्रमांक 01123, 01124, 01469 आणि 01470 यांचे आरक्षण दि. 7 ऑगस्ट रोजी सुरू होईल.
गाडी क्रमांक. 02139, 02140, 01439, 01440 यांचे आरक्षण दि. 9 ऑगस्ट रोजी सुरू होईल.