
लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार ? समोर आली मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट समोर आली आहे.
खरं तर ऑगस्ट महिना संपला आता फक्त आठ दिवसांचा काळ शिल्लक राहिलाय. यामुळे ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी खात्यात येणार हा मोठा सवाल आहे. खरे तर लाडक्या बहिणीच्या खात्यात जुलै महिन्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचे पैसे जमा झाले आणि यामुळे राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला. लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरु झाली आहे.
या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातोय. राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील आणि अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळतोय.
ही योजना फक्त राज्यातील महिलांसाठी आहे. मात्र या योजनेचा अनेकांनी अपात्र असतानाही लाभ उचलल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. काही पुरुषांनी सुद्धा या योजनेच्या पैशांवर डल्ला मारला आहे.
त्यामुळे आता या योजनेची काटेकोर पडताळणी सुरू करण्यात आलीये. अंगणवाडी सेविकांकडून ही पडताळणी केली जात असून यासाठी घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांची चौकशी करत आहेत.
अशा स्थितीत आता लाडक्या बहिणी ऑगस्टचा पैसा कधी येणार हा प्रश्न विचारत आहेत. खरतर 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय घेतलाय.
एवढेच नाही तर राज्य कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याचा पगार 26 तारखेलाच देण्याचा निर्णय झालेला आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतील आणि कोकणातील अनेक शाळांना सलग सुट्ट्या सुद्धा मंजूर करण्यात आलेल्या आहेत.
हेच कारण आहे की लाडक्या बहिणींना गणेशोत्सवाच्या आधीच ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळू शकतात असा दावा केला जातोय. येत्या चार दिवसांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज आहे.
पण जर गणेशोत्सवाच्या आधी लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जातील असे म्हटले जात आहे.