सगळे मराठे हे कुणबीच आलस्याचा सातारा गॅझेटमधून नवा संदर्भ?

सगळे मराठे हे कुणबीच आलस्याचा सातारा गॅझेटमधून नवा संदर्भ?

 

बारामती: मराठा आरक्षणाच्या चर्चेत आता सातारा गॅझेट हा ऐतिहासिक दस्तावेज पुन्हा समोर आला आहे. 1881 पासूनच्या नोंदी धुंडाळल्यावर महत्त्वाचे मुद्दे पुढे आले आहेत. 1881 ची जनगणना – सातारा जिल्ह्यातील बहुतांश लोक कुणबी असल्याची नोंद आहे. त्या वेळी ‘मराठा’ अशी जात स्वतंत्रपणे अस्तित्वात नव्हती. एकूण 5,83,569 लोकसंख्या कुणबी होती, म्हणजेच सुमारे 70 ते 75 टक्के.

1901 मध्ये स्थिती : सातारा जिल्ह्याची लोकसंख्या होती 8,49,672. यात मोठा हिस्सा पुन्हा कुणबी समाजाचाच होता. हळूहळू या कुणब्यांनाच ‘मराठा’ म्हणून ओळख मिळू लागली. 1885 चे सातारा गॅझेटियरचा विचार करता त्यावेळी जिल्ह्याची लोकसंख्या 10,62,350 दाखवली आहे. यापैकी 2.5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या कुणबींची होती, म्हणजेच 23 टक्क्यांपेक्षा जास्त. गॅझेटियरनुसार कुणबी आणि मराठा हे अनेकदा एकाच गटात समाविष्ट केले जात. कारण त्यांचा व्यवसाय, जीवनपद्धती आणि समाजातील स्थान साधारण सारखेच होते.

ब्रिटिश सरकारने हे गॅझेटियर तयार करताना जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक बाबींची नोंद केली होती. त्यात स्पष्ट उल्लेख आहे की कुणबी समाज प्रामुख्याने शेतीवर आधारित होता आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जात होता. त्यामुळे, जर हा दस्तावेज अधिकृतरीत्या ग्राह्य धरला, तर मराठा समाजातील अनेकांना पूर्वाश्रमीचे कुणबी म्हणून दाखले मिळू शकतात.  या पार्श्वभूमीवर सरकारसमोर आता जबाबदारी आहे – मराठा आणि कुणबी समाजाच्या ऐतिहासिक एकरूपतेच्या आधारे आरक्षणाचा मार्ग सुकर करणे.