उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या शिक्षण संस्थेतील भोंगळ कारभाराचे काढले वाभाडे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या शिक्षण संस्थेतील भोंगळ कारभाराचे काढले वाभाडे

 

माळेगांव :माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलमध्ये इतकी भयानक परिस्थिती आहे, मी जनरल बॉडीला सांगणार आहे. कुठून ते माळेगावचे चेअरमन पद घेतलंय. जसं मी खोलात जातोय, तसं एवढे वेगवेगळे प्रकार त्या शैक्षणिक संकुलामध्ये झालेले आहेत. मी तिथे विचारलं शरद पवार साहेब याचे अध्यक्ष आहेत. पवार साहेबांना तरी हे माहिती आहे का नाही? असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावच्या शिक्षण संस्थेतील भोंगळ कारभाराचे वाभाडे काढले.

ते म्हणाले, या संस्थेला ११ ते १२ कोटी रुपये तोटा आहे तिथे. हे सगळं ११ ते १२ कोटी रुपये वाढवून माझ्या हातामध्ये दिलं का, कर्जबाजारी करून? पगार तिथे व्यवस्थित नाही. तिथे खोगीर भरती करून ठेवलेली आहे. नॉनटीचिंग स्टाफ तर इतका भरलेला आहे की,  काही जणांना तर कामच नाही. त्यांचं शिक्षण नाही. कुणी आला की, ह्याला लावा, त्याला लावा. अरे, आओ जाओ घर तुम्हारा अशी ती संस्था आहे काय?

पुढे बोलताना पवार यांनी या संस्थेचा पूर्ण हिशोबच मांडला. आज देखील या वर्षात सगळी फी आणि पगार सगळा हिशोब काढला तर साडेतीन ते चार कोटी चा तोटा आहे. कोण तोटा देणार आहे? कोण काय करणार आहे, काही बघितलं नाही. कर्ज वाढत चाललं आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतही कर्ज काढले आहे. ते पण ११ कोटी रुपये कर्ज आहे. ते कोण फेडणार? काही उत्तर नाहीत. मी आपलं बारामतीमध्ये चांगलं काम करतोय. आणि तुम्ही मात्र संस्था चालवत असताना ही परिस्थिती निर्माण करताय? 

आता ते खोलात गेलं म्हणून सगळं बाहेर निघालं. अजून त्याचं ऑडिट करायला लावलं आहे. एकावर तर आज गुन्हा दाखल केला आहे. मला  डीवायएसपींनी सांगितलं. कुणीतरी तीन ते चार वर्षे फ्रॉड केला आहे तिथे. ते सगळे आकडे बाहेर आले. २५ ते ३० लाखाचा फ्रॉड आहे अस वाटतंय. अजून नीट तपासल्यावर अजून काय काय निघणार आहे माहिती नाही. अशा शब्दात माळेगावच्या शैक्षणिक संकुल मधील झालेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेखही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

पुढे बोलताना पवार यांनी संस्थेचा साडेआठ कोटी रुपये टॅक्स थकवलेला आहे. काही कोणी बघितलं नाही. ही गोष्ट शैक्षणिक संकुलामध्ये पण तशीच आहे. तसंच त्या माळेगांव कारखान्यात पण येणाऱ्या २७ तारखेला माझं भाषण ऐका, मग सांगतो सगळं काय काय ते. अस सांगत आता माळेगांव कारखान्याबाबत काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्व सभासदांचे लक्ष लागले आहेत.

तसेच आपल्या इथे एमबीए, बी. फार्मसी, डी.फार्मसीला सुद्धा एवढी डिमांड आहे. परंतु तिथं शिस्त नाही. लोकं सह्या करतात आणि बाहेर फिरत बसतात. तिथं कामाला आहेत आणि त्यांचे व्यवसाय बाहेर दुसरेच आहेत.आणि पुन्हा संध्याकाळी येतात. कोणी कोणाचं ऐकत नाही. तिथे कोणाचं प्रेशर नाही, काही नाही. हा अमक्या चेअरमनने लावलेला आहे, तो तमक्या चेअरमनने लावलेला आहे. असे बरेचशी कामं वशील्याचीच झालेली आहेत तिथं. मी पुढच्या वेळेस या सगळ्या स्टाफची मीटिंग घेणार आहे.

या संस्थेत स्टाफला आपलेपणाची जी भावना असते, ती कोणाच्यातच नाही. मेस पण कुणाकुणाच्या चालू नाहीत. काय काय मेस इतक्या खराब आहेत. मुलींना जर तिथे मेसला जा म्हटलं, तर आम्हाला नाही जायचं त्या मेसमध्ये असं सांगतात. ही अवस्था आहे अशा खूप गोष्टी आहेत. परंतु बरंच काही दुरुस्ती करण्याची गरज आहे. अर्थातच सर्वसामान्य सभासदांची साथ आहे म्हणून मी ते करू शकेल. असंही सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव येथील शिवनगर प्रसारक मंडळाच्या संस्थेच्या भोंगळ कारभारच उघड केला.