आयुष कोमकर खून प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं विधान

आयुष कोमकर खून प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्त्वाचं विधान

 

पुणे : पुणे शहरातील नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज याच्या खुनाला एक वर्ष होताच,या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकर चा मुलगा आयुष याच्यावर दोघांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. आयुष कोमकर खून प्रकरणी मुख्य आरोपी बंडू आंदेकर सह १२ आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौर्‍यावर होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आयुष कोमकर च्या खुनामुळे शहरात टोळी युद्ध डोकं वर काढतय का या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, हे टोळी युद्ध वैगरे काही नाही, हे आपापसात यांचे काही शत्रुत्व आहे. ते आम्ही काही चालू देणार नाही. कोणीही डोकंवर काढलं, तर त्याच डोकं कस खाली करायच, हे आम्हाला माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.