
उद्यापासून बचत उत्सव सुरु; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा; १२ टक्के जीएसटी ज्या गोष्टींवर होता त्यापैकी ९९ टक्के गोष्टी ५ टक्के जीएसटीच्या कक्षेत
नवरात्रीचा उत्सव सुरु होतो आहे, त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. देशात नवरात्रीचा उत्सव सुरु होत असतानाच नव्या बदलाना आपला देश सामोरा जातो आहे. जीएसटीमधल्या सुधारणा उद्याच्या पहिल्या किरणापासून सुरु होतो आहे. जीएसटी बचत उत्सव सुरु होतो आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी सोप्या पद्धतीने खरेदी करु शकणार आहात. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन सुरु झालं आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाची घोषणा केली.
आपल्या देशात जीएसटी रिफॉर्म होत आहेत-मोदी
आपल्या देशातले गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, दुकानदार, महिला, उद्योजक या सगळ्यांना बचत उत्सवाचा फायदा होणार आहे. सणवार सुरु होत आहेत आणि सगळ्यांचा उत्सव गोड होणार आहे. मी देशातल्या कोटी कोटी परिवारांना जीएसटी सुधारणा आणि बचत उत्सवाच्या शुभेच्छा देतो. जीएसटी सुधारणा या भारतात सुबत्ता आणतील. प्रत्येक राज्याला विकासाचा साथीदार होता येणार आहेत.
जुना इतिहास बदलून आपण नवा इतिहास रचतो आहोत-मोदी
२०१७ मध्ये भारताने जीएसटी रिफॉर्मच्या दृष्टीने पावलं उचलली तेव्हा जुना इतिहास बदलून नवा रचण्याची तयारी सुरु झाली होती. आपण सगळे असो किंवा देशातले व्यापारी विविध करांमध्ये अडकलो होतो. ऑक्ट्रॉय, सेवा कर, अमुक कर असे अनेक कर होते. एका शहरातून दुसऱ्या शहरात माल पाठवायचा असेल तर अनेक चेक पोस्ट पार करावी लागत. प्रत्येक ठिकाणी करांचे नियम वेगळे होते. मात्र आपण सगळ्या गोष्टींसाठी एकाच कराच्या अंतर्गत आणल्या. जीएसटीच्या नव्या सुधारणा लागू होत आहेत. ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टॅक्स स्लॅब आता असतील. त्यामुळे रोजच्या वापरातील गोष्टी आणखी स्वस्त होती. खाणं, पिणं, ब्रश, पेस्ट, साबण या आणि अशा अनेक वस्तू किंवा सेवा या टॅक्स फ्री होतील किंवा ५ टक्केच कर द्यावा लागेल. १२ टक्के कर ज्या गोष्टींवर होता त्यापैकी ९९ टक्के गोष्टी आपण ५ टक्के जीएसटीच्या कक्षेत घेतल्या आहेत.
आणखी काय म्हणाले मोदी?
जीसएटीमधल्या सुधारणा या मध्यमवर्ग, युवक, शेतकरी, महिला, दुकानदार, नागरिक, उद्योजक अशा सर्वांनाच या बचत उत्सवाचा खूप फायदा होणार आहे. म्हणजेच सणांच्या या उत्सवात सर्वांचेच तोंड गोड होईल. देशातील प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार आहे. मी देशातील कोट्यवधी कुटुंबांना जीएसटीच्या नव्या सुधारणांबद्दल शुभेच्छा देतो. या सुधारणा भारताच्या विकासाला गतिमान करतील असंही मोदी यांनी म्हटलं आहे.