कोणत्याही परीक्षेविना रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल 1763 पदांसाठी भरती सुरू, अर्ज कुठे अन् कसा करावा ?

कोणत्याही परीक्षेविना रेल्वेत नोकरीची संधी; तब्बल 1763 पदांसाठी भरती सुरू, अर्ज कुठे अन् कसा करावा ?

 

रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने 1763 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या नोकरीची सर्वात खास गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाईल त्यानंतर कागदपत्र पडताळणी होईल.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेसाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणे आणि संबंधित ट्रेडमध्ये प्रमाणपत्र मिळवलेले असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 ऑक्टोबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही www.rrcpryj.org या वेबसाइटला भेट देऊ शकता. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. सर्वात आधी https://examerp.com/registration/s_login_new.aspx या वेबसाइटवर जाऊन New Registration या पर्यायावर क्लिक करा. 

त्यानंतर तुमचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यांसारखी माहिती भरून नोंदणी करा. लॉगिन केल्यावर, तुम्हाला अर्ज पूर्ण भरावा लागेल, फोटो आणि सहीसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज सबमिट झाल्यावर, त्याची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवणे महत्त्वाचे आहे.